पुणे : बँकेच्या बाहेर नागरिकांची गर्दी पाहून माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी गाडी थांबवून नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शनिवारी भिगवण रोडवरून जातांना त्यांना ओरियंल बँकेबाहेर नागरिकांची गर्दी दिसली. त्यावेळी त्यांनी गाडी थांबवली आणि नागरिकांना नोटबंदीनंतर काय समस्या येतायत ते जाणून घेतलं. 


शिवाय बँकेतही त्यांनी भेट दिली आणि तिथल्या कर्मचा-यांना नव्या नोटा उपलब्ध होतायत का हेही जाणून घेतलं.