शेगाव : पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटबंदीच्या केंद्राच्या निर्णयाचं अनेकांनी स्वागत केलं. तर काहींनी मोदींच्या या निर्णयावर टीकासुध्दा केली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

खात्यात पैसे असूनही अनेकांना बँकेच्या बाहेर पैसे बदलून घेण्यासाठी तासनतास रांगेत ताटकळत राहवं लागत असल्यानं लोकांमध्ये तीव्र नाराजी आहे. 


मात्र शेगावच्या एका पाणी पुरीवाल्याने मोदींच्या या निर्णयाला पाठिंबा दर्शवत स्वत:च्या ग्राहकांसाठी पेटीएमची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे शेगावात पाणीपुरीवाला सध्या चर्चेत आहे.