मंत्री म्हणवत मतदान केंद्राबाहेर महिला पोलिसाला दमबाजी
राज्य सहकार परिषद अध्यक्ष शेखर चरेगावकर यांनी मतदान केंद्राबाहेर महिला पोलीस कर्मचा-याला दमबाजी केली आहे.
कराड : राज्य सहकार परिषद अध्यक्ष शेखर चरेगावकर यांनी मतदान केंद्राबाहेर महिला पोलीस कर्मचा-याला दमबाजी केली आहे. चरेगावकरांची गाडी मतदान केंद्रापासून 100 मीटरच्या आत अडवल्याने चरेगावकरांनी या महिला पोलिसाला दमबाजी केली आहे.
सहकार परिषदेचे अध्यक्ष असलेले चरेगावकर स्वतःला मंत्री म्हणवत होते हे विशेष. माझ्या गाडीला मंत्रालयात जाण्याचा पास आहे इथे का अडवता असं म्हणून त्यांनी कर्तव्य बजावणा-या महिला पोलीस शिपायाला दमबाजी केली. दरम्यान या प्रकाराबाबत चरेगावकर यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न झी 24 तासने केला. मात्र प्रतिक्रिया देतानाही चरेगावकर यांचा हेका कायम होता.