हाणामारीत एकाची हत्या, भाजप पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल
दोन गटात झालेल्या हाणामारीतून एकाचा खून झाल्याची घटना शिर्डीच्या राहता तालुक्यातल्या पिंपळस इथं घडली. अविनाश कापसे असं या तरुणाचं नाव आहे. याप्रकरणी भाजप पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिर्डी : दोन गटात झालेल्या हाणामारीतून एकाचा खून झाल्याची घटना शिर्डीच्या राहता तालुक्यातल्या पिंपळस इथं घडली. अविनाश कापसे असं या तरुणाचं नाव आहे. याप्रकरणी भाजप पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
धारदार शस्त्रानं भोसकून ही हत्या करण्यात आली. दोन गटात आधी भांडण झालं आणि या भांडणाचं पर्यवसान खूनात झालं. या मारहाणीत तिघे जण गंभीर जखमी झालेत. या प्रकरणी भाजप जिल्हा सरचिटणीस नितीन कापसेसह चौदा जणांविरोधात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनेनंतर नितीन कापसे फरार झालाय. दरम्यान चार आरोपींना पोलिसांनी अटक केलीय. दीड वर्षांपूर्वी अविनाश कापसेने काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्याचाच राग मनात धरुन नितीन कापसेने हा हल्ला केला.
या घटनेची माहिती समजताच मोठ्या प्रमाणात कापसे समर्थक आणि काँग्रेस कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. राहतामध्ये आरोपीच्या अटकेच्यी मागणी करत नगर मनमाड रसत्यावर रास्ता रोको आंदोलनही केलं होते.