शिर्डी : नोटाबंदीच्या निर्णयामुळं देशातल्या अनेक छोट्या-मोठ्या उद्योगांना फटका बसला तर अनेकांचे व्यवहार ठप्प झाले. याचा मंदिरांच्या देणग्यांमध्येही मोठा फटका बसलाय. मात्र शिर्डीच्या साईबाबांच्या झोळीत दान देणा-यांनी भरभरून देणग्या दिल्या आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नोटाबंदीच्या पन्नास दिवसात तब्बल 35 कोटी रुपयांचं दान साईंच्या चरणी अपर्ण केलंय. एवढंच नव्हे तर सुमारे तीन किलो सोनं आणि 56 किलो चांदीही साईंच्या चरणी दानाच्या स्वरूपात भक्तांनी अपर्ण केले आहे.


५० दिवसांमध्ये साईंच्या चरणी एवढं दान


५० दिवसात साईचरणी ३१ कोटी ७३ लाखांच दान


व्हीआयपी पेड दर्शनाच्या माध्यमातून ३ कोटी १८ लाख


२ किलो ९०९ ग्राम सोने, ५६ किलो चांदी


दानपेटीत १८ कोटी ९६ लाख


देणगी काउंटर वर ४ कोटी २५ लाख


ऑनलाईन ६ कोटी ६६ लाख


डेबीट / क्रेडीट कार्ड द्वारे २ कोटी ६२ लाख


चेक / डीडी - ३ कोटी ९६ लाख


प्रसादालय मोफत अन्नदान योजना - १६ लाख रुपयांच दान


५० दिवसात ४ कोटी ५३ लाखांच्या १००० हजार आणि ५०० च्या जुन्या नोटा


तर ३ कोटी ८० लाखांच्या नव्या नोटा साईचरणी भक्तांकडून अर्पण