24 आणि 31 डिसेंबरला रात्रभर खुलं राहणार साई मंदिर
नाताळच्या सुट्यांमुळे शिर्डीत साईबाबाच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे.
शिर्डी : नाताळच्या सुट्यांमुळे शिर्डीत साईबाबाच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. आज दोन लाखांहून आधिक भाविक शिर्डीत दाखल झाले आहेत.
भक्तांच्या गर्दीने साईमंदिराकडे जाणारे सर्व रस्ते फुलून गेले आहेत. यावर्षी साई संस्थानने पहील्यांदाच 24 डिसेंबर म्हणजे आज रात्रभर आणि 31 डिसेंबरला रात्रभर साईमंदिर दर्शनासाठी खुले ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
सुट्ट्यांमध्ये शिर्डीला येणाऱ्या भक्तांचा ओघ लक्षात घेता साईबाबा संस्थानच्या वतीनं दर्शनाची तसेच निवासाची चोख व्यवस्था करण्यात आलीय. त्याचबरोबर भक्तांच्या सुरक्षेचीही काळजी घेतली जातेय.