महाराष्ट्रात युती तोडल्याने शिवसैनिकांचा जल्लोष
पुण्यात शिवसैनिकांनी युती तुटल्याचा आनंद साजरा केलाय. शिवसेना कार्यालयासमोर शिवसैनिकांचा जल्लोष सुरू आहे.
पुणे : पुण्यात शिवसैनिकांनी युती तुटल्याचा आनंद साजरा केलाय. शिवसेना कार्यालयासमोर शिवसैनिकांचा जल्लोष सुरू आहे.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आणि युतीच्या संभ्रमामुळे गेल्या काही दिवसांत आलेली मरगळ दूर करण्याचा हा प्रयत्न आहे.
तर नागपुरातही शिवसेना कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुख्यालय असलेल्या रेशीमबाग भागात कार्यकर्त्यांनी फटाके फोडत आनंद व्यक्त केला.