नांदेड : शिवसेना आणि भाजपमधला शाब्दिक वाद आता रस्त्यावर येऊन पोहोचला आहे. नांदेडमध्ये शिवसेना-भाजप कार्यकर्ते एकमेकांना भिडले आहेत. शिवसेना खासदार संजय राऊत यांचा पुतळा भाजप कार्यकर्त्यांनी जाळला, याला शिवसैनिकांनी विरोध केला. भाजपा युवा मोर्चा अध्यक्षाची गाडी शिवसैनिकांनी फोडली. याप्रकरणी पोलिसांनी शिवसेना-भाजपच्या कार्यकर्त्यांना अटक केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तर मुंबईतल्या बोरिवलीमधल्या भगवती रूग्णालयाच्या उदघाटनादरम्यान शिवसेना आणि भाजपचे कार्यकर्ते आमनेसामने आले. दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. भाजप समोर आली तर आम्ही शिवसेनेच्या माध्यमातून धडा शिकवू असा इशारा शिवसेना आमदार प्रकाश सुर्वेंनी दिला, तर मुंबईत पावसाचा जोर वाढल्यानं भाजप-शिवसेनेलाही जोर आल्याचं मार्मिक भाष्य भाजप खासदार गोपाळ शेट्टी यांनी केलं आहे.