पिंपरी चिंचवड : शिवसेनेचे माजी खासदार गजानन बाबर आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत बाबर भाजपचा शेला अंगावर घेतील.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लोकसभेला तिकीट नाकारल्यापासून बाबर पक्ष नेतृत्वावर नाराज होते.  लोकसभेच्या निवडणूकच्यावेळीच त्यांनी पक्ष सोडला होता.  


शिवसेना सोडताना गजानन बाबर यांनी उद्धव ठाकरेंनी तिकीटासाठी पैसे मागितल्याचा आरोपही केला होता. त्यामुळे गेल्या अडीच वर्षात ते शिवसेनेपासून आणखीच दूर गेले. 


गजानन बाबर यांनी पिंपरी-चिंचवड येथे शिवसेनेची पहिली शाखा स्थापन केली होती, २००९ साली शिवसेनेच्या तिकीटावर ते खासदार देखील झाले, यानंतर त्यांनी २०१४ मध्ये शिवसेनेचं तिकिट न मिळाल्याने शिवसेना सोडली होती. शिवसेनाविरोधात लक्ष्मण जगताप यांना त्यांनी पाठिंबा दिला होता.