नागपूर : मुंबईत पालिका निवडणुकीत आमची खरी लढत काँग्रेस, राष्ट्रवादी सोबत आहे. आम्ही त्याना शत्रू मानतो.  भाजप इतर कोणाला ही शत्रू मानत नाही. जो सोबत येईल त्याच्यासह जो येणार नाही त्याच्या शिवाय निवडणूक जिंकू. शिवसेना आमचा सरकारमधील साथीदार आहे, पण वेगळा पक्ष आहे. मात्र, निवडणुकीतमध्ये आम्ही वेगवेगळे आहोत, असे प्रतिपादन भाजप प्रदेश अध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी येथे केले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भाजप आणि शिवसेना स्वतंत्र निवडणूक लढत असले तरी सेनेने सरकारचा पाठिंबा काढून घेतलेला नाही. राज्य सरकारला ५ वर्ष धोका नाही. सरकार ५ वर्ष चालेल. निवडणुकीत आरोप प्रत्यारोप होत असतात. निवडणुकानंतर आम्ही स्वबळावर सत्ता स्थापन करू. आम्ही त्यांच्या टिकेकडे लक्ष देत नाही, असे दानवे म्हणालेत.


आमचे लक्ष सरकार चालवण्यावर, आमच्या नेत्यांनी कोणावर आरोप प्रत्यारोप केलेले नाही. निवडणुकीचा वातावरण प्रदूषित होऊ नये, असा आमचा प्रयत्न आहे. मुंबईत आमची खरी लढत काँग्रेस, राष्ट्रवादी सोबत आहे. आम्ही त्याना शत्रू मानतो. भाजप इतर कोणाला ही शत्रू मानत नाही. शिवसेना आमचा सरकारमधील साथीदार आहे, पण वेगळा पक्ष आहे. शिवसेना साथीदार आहे, मात्र निवडणुकीतमध्ये आम्ही वेगवेगळे आहोत, अशी सारवासारव दानवे यांनी करावी लागली.