शिवसेनेकडून पुन्हा एकदा राष्ट्रपतीपदासाठी `मोहन भागवत`
सरसंघचालक मोहन भागवत यांनी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत उतरावं असं मत उद्धव ठाकरेंनी मांडलंय.
औरंगाबाद : सरसंघचालक मोहन भागवत यांनी राष्ट्रपतीपदाच्या स्पर्धेत नसल्याचं स्पष्ट केलं असले तरी शिवसेनेने पुन्हा एकदा राष्ट्रपतीपदासाठी मोहन भागवत यांचे नाव पुढं केलंय.
हिंदू राष्ट्राचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सरसंघचालक मोहन भागवत यांनी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत उतरावं असं मत उद्धव ठाकरेंनी मांडलंय.
भारत हिंदू राष्ट्र व्हावं, अशी इच्छा आहे. आता बऱ्याच वर्षांनी देशात सत्तापरिवर्तन झाले असून हिंदू राष्ट्राचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मोहन भागवत यांनी राष्ट्रपती होणे गरजेचे आहे असे ठाकरें म्हणाले. ते औरंगाबादमध्ये बोलत होते.