जैतापूर अणुप्रकल्पाला सेनेचा विरोध कायम
शिवसेनेचा जैतापूर प्रकल्पाला विरोध कायम आहे. भाजप हा प्रकल्प कोकणाच्या माथी मारण्याचा प्रयत्न करत असल्याची टीका शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी केली आहे. या प्रकल्पाला शिवसेना विरोध करणार असून या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेणार असल्याचं राऊत म्हणालेत.
मुंबई : शिवसेनेचा जैतापूर प्रकल्पाला विरोध कायम आहे. भाजप हा प्रकल्प कोकणाच्या माथी मारण्याचा प्रयत्न करत असल्याची टीका शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी केली आहे. या प्रकल्पाला शिवसेना विरोध करणार असून या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेणार असल्याचं राऊत म्हणालेत.
जैतापूर अणुउर्जा संदर्भात नुकताच एक समझौता करार करण्यात आला. यामध्ये चार अणुभट्याऐवजी आता या ठिकाणी सहा अणुभट्ट्या बसवण्यात येणारेत. या प्रकल्पात ९९०० मेगावँट ऊर्जानिर्मितीची क्षमता आहे. प्रत्येक अणुभट्टीत १६५० मेगावॅट वीज तयार होणारेय. या आराखड्यात पुर्वी तीन किंवा चार अणुभट्ट्या होत्या मात्र फ्रान्सचे अध्यक्ष फ्रान्स्वा ओलांद जानेवारीत भारत भेटीवर आले होते. त्यानंतर दोन महिन्यांच्या चर्चेनंतर हा निर्णय घेण्यात आला. त्यामुळं शिवसेना पुन्हा एकदा आक्रमक झालीय.