शिवसेनेचे चंद्रकांत खैरे पुन्हा वादात, एमआयएम नगरसेवकाला धमकावल्याचा आरोप
औरंगाबादचे शिवसेना खासदार चंद्रकांत खैरे पुन्हा एकदा वादात सापडले आहेत.
औरंगाबाद : औरंगाबादचे शिवसेना खासदार चंद्रकांत खैरे पुन्हा एकदा वादात सापडले आहेत. अतिक्रमण काढण्यावरून एमआयएम नगरसेवकाला धमकावल्याची आवाजाची एक क्लीप नगरसेवक फिरोज खान आणि एमआयएम आमदार इम्तियाज जलील यांनी दिली आहे.
नवाबपुरा भागात अतिक्रमण हटवत असताना एक दुकान पडण्यावरून हा वाद झाला. त्यावेळी एमआयएम नगरसेवक फिरोज खान यांनी दुकानदाराला दुकान रिकामे करायला लावली असा आरोप खैरे यांनी केला आहे, तर खैरेंनी दमदाटी केल्याचा आरोप नगर सेवक फिरोज खान यांनी केला.
मी आलो तर दंगल होईल अस खैरे यांनी म्हणलं असून नवाबपुरा भागात रस्ता रुंदीकरण मोहीम सुरु असून अनेकांची घर त्यामध्ये तुटणार आहेत. अनेक नागरिकांना घर रिकाम करण्यासाठी मुदत लागत असून त्याठिकाणी क्षीरसागर कुटुंब राहत असून त्यांच्या घरी शुभकार्य असल्याने त्यांनी कारवाईला मुदत मागितली.
नगर सेवक असल्याने त्यांना मदत करायला गेलो मात्र खैरे यांनी चुकीचा अर्थ काढून शिवीगाळ केल्याचा आरोप फिरोज खान यांनी केला. तर एमआयएम पक्षाने खैरे यांच्या वक्तव्याचा विरोध केलाय. एमआयएम पक्षाचे आमदार इम्तियाज जलील यांनी पत्रकार परिषद घेत खैरे यांच्या विरोधात पोलीस कारवाई करत नसल्याने तक्रार कशी द्यावी असा प्रश्न उभा करत खैरे यांची अरेरावी वाढली असल्याचा आरोप केलाय.