पनवेल : समोर उभ्या ठाकलेल्या पनवेल महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना - मनसेनं पुन्हा एकदा कंबर कसलीय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पनवेल महापालिकेत शिवसेनेनं स्वबळावर लढण्याची तयारी सुरू केलीय. मातोश्रीवरून पनवेलमध्ये १० आमदार पाठवण्यात आलं आहे. आमदार सुनील प्रभू, गृहनिर्माण राज्यमंत्री रविंद्र वायकर यांच्यासह ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, रायगड जिल्हा संपर्क प्रमुख आदेश बांदेकर हे निवडणुकीची सूत्रं सांभाळणार आहेत. याबाबत खारघरमध्ये बैठक झाली. 


तर महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत आता मनसेनंही जोरदार तयारी सुरू केलीय. मनसेचे सरचिटणीस नितीन सरदेसाई यांच्या उपस्थितीत पनवेलमध्ये इच्छुकांच्या मुलाखती आणि कार्यकर्ता मेळावा झाला. सध्यातरी मनसेकडे प्रत्येक प्रभागासाठी उमेदवार नसल्याचं दिसतंय. मात्र मुंबई मनपा पराभवानंतर मनसेचा हा शेवटचा पराभव अशी गर्जना करणारे राज ठाकरे आता पनवेलमध्ये कोणती रणनिती आखतात हे पाहणं औत्सुक्याचं आहे.