मुंबई : भ्रष्टाचार, काळा पैसा आणि खोट्या नोटांचे व्यवहार रोखण्यासाठी मोदी सरकारनं 500 आणि हजारच्या जुन्या नोटांवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या निर्णयावर शिवसेनेनं मात्र प्रश्न उपस्थित केले आहेत.


पाकव्याप्त काश्मीरमध्ये सर्जिकल स्ट्राईक केल्यानंतर पाकिस्तानला जरब बसेल असं सांगण्यात आलं, पण त्यानंतरही सीमारेषेवर पाकिस्तानचा गोळीबार सुरुच आहे. त्यामुळे मोदींचा हा दुसरा सर्जिकल स्ट्राईक किती यशस्वी होईल हे येणारा काळच ठरवेल, असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आजच्या 'सामना'मध्ये म्हणाले आहेत.