औरंगाबाद : आज रात्री 12 वाजेपर्यंत वाद्य संगीत वाजवण्यास परवानगी मिळाली नाही तर विसर्जन होणार नाही, असा इशारा शिवसेनेचे औरंगाबादचे खासदार चंद्रकांत खैरे यांनी दिला आहे. नियम बदलून हिंदूंच्या सणांची गोची करण्याचा प्रयत्न होतं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आमचं सरकार असूनही असले प्रकार होत असल्यानं वेदना होत आहेत, अशी प्रतिक्रिया खैरेंनी दिली आहे. विसर्जन मिरवणुकीत वाद्य वाजवण्यासाठी रात्री 12 वाजेपर्यंत परवानगी देण्यात यावी यासाठी खैरेंनी जिल्हाधिका-यांना निवेदनही दिलं आहे.