ठाण्यात शिवसेनेचा भगवा फडकला! एमआयएमचीही एन्ट्री
मुंबई महापालिकेमध्ये शिवसेना-भाजपमध्ये अटीतटीची लढत होत असताना ठाण्याचा बालेकिल्ला राखण्यात शिवसेनेला यश आलं आहे.
ठाणे : मुंबई महापालिकेमध्ये शिवसेना-भाजपमध्ये अटीतटीची लढत होत असताना ठाण्याचा बालेकिल्ला राखण्यात शिवसेनेला यश आलं आहे. ठाण्यामध्ये शिवसेनेनं 60 जागा जिंकल्या आहेत. तर 31 जागा जिंकणारा राष्ट्रवादी काँग्रेस दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला आहे. भाजपला ठाण्यामध्ये 21 आणि काँग्रेसला 3 जागा मिळवता आल्या आहेत.
ठाण्याच्या राजकारणामध्ये एमआयएमनं एन्ट्री घेतली आहे. मुंब्र्याच्या प्रभाग ३३ अ मधून शेख हजारा आणि ड मधून आझमी शाहिद हे एमआयएमचे उमेदवार निवडून आलेत. दरम्यान शिवसेनेचे खासदार राजन विचारे यांचा पुतण्या मंदार विचारे याचा या निवडणुकीत पराभव झाला आहे. तर विचारेंची पत्नी नंदिनी विचारे यांचा मात्र विजय झाला आहे.