सीमीच्या दहशतवाद्यांचं सोलापूर कनेक्शन
भोपाळ कारागृह तोडून पळून जाणाऱ्या सीमीच्या दहशतवाद्यांचं एन्काऊंटर करण्यात आलं. यात सोलापूरातील महंमद खालिद महंमद सलीम मुछाले याचाही समावेश आहे. मुछाले हा मुळचा सोलापूरातील असल्यानं तो रहात असलेल्या नई जिन्दगी चौकात तणावपूर्ण शांतता आहे.
सोलापूर : भोपाळ कारागृह तोडून पळून जाणाऱ्या सीमीच्या दहशतवाद्यांचं एन्काऊंटर करण्यात आलं. यात सोलापूरातील महंमद खालिद महंमद सलीम मुछाले याचाही समावेश आहे. मुछाले हा मुळचा सोलापूरातील असल्यानं तो रहात असलेल्या नई जिन्दगी चौकात तणावपूर्ण शांतता आहे.
खलिद मुछाले आणि त्याचा भाऊ नई जिंदगी भागात टेलरींगचा व्यवसाय करायचा, तो सीमीचा स्लिपींग सेल होता. खालिद मुछाले सिमीचा स्लीपर सेल होता. खांडवातील फरार दहशतवाद्यांना त्यानं सोलापूरात आश्रय दिला होता.