भेटा १३ वर्षांच्या `कादंबरीकारा`ला!
अवघी १३ वर्षांची मुलं एरवी खेळतात, बागडतात, मस्ती करतात... मात्र, ठाण्यातल्या डी ए व्ही या इंग्रजी माध्यमाच्या शाळेतला सोहम घोडके चक्क कादंबरीकार झालाय. या बालवैज्ञानिकाच्या गरुड भरारीबाबत आपणही जाणून घेऊया...
ठाणे : अवघी १३ वर्षांची मुलं एरवी खेळतात, बागडतात, मस्ती करतात... मात्र, ठाण्यातल्या डी ए व्ही या इंग्रजी माध्यमाच्या शाळेतला सोहम घोडके चक्क कादंबरीकार झालाय. या बालवैज्ञानिकाच्या गरुड भरारीबाबत आपणही जाणून घेऊया...
ठाण्यातल्या साकेत भागात राहणारा १३ वर्षांचा सोहम घोडके यानं पाचवीत असतानाच, 'ज्येतोनिमु स्केटलर' हे पुस्तक वाचलं. त्यानंतर सोहमनं कादंबरी कशी लिहिली जाते, याचा अभ्यास करुन स्वतःच कादंबरी लिहिली. 'wars of octavlon' असं त्याच्या कांदबरीचं नावव आहे.
आपल्या लाडक्या लेकाच्या यशाचं त्याच्या उच्च-शिक्षीत आईवडिलांनाही विशेष कौतुक आहे. पुढल्या तीन महिन्यांत सोहमच्या दुसऱ्या कादंबरीचं प्रकाशन होत आहे. तर पुढल्या लेखनकार्यातही तो सध्या मग्न आहे.
मात्र हे सारं तो अभ्यास सांभाळूनच करत आहे. त्याचं पुस्तक भारत, ब्रिटन आणि अमेरिका या देशांमध्येही उपलब्ध आहे.