कोल्हापूर : शहरातील उमा टॉकीज परिसरात काल घडलेल्या अपघातातली एसटी बस ही पुण्याचीच होती. तसेच चालकाला डबल ड्युटी लावण्यात आली होती, हे स्पष्ट झाले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ज्या एसटीमुळे २०१२ मध्ये पुण्यात अपघात झाला होता तीच एसटी कोल्हापूर मार्गावर सोडण्यात आली होती. पुण्यातला माथेफिरु एसटी बसचालक संतोष माने याने याच बसने ९ जणांचे बळी घेतले होते. त्यामुळे हे दोन्ही अपघात घडवणारी ही बस किलर बस ठरली आहे. 


दरम्यान काल कोल्हापूर एसटी बसचे चालक रमेश कांबळे हे डबल ड्युटी करत होते. रमेश कांबळे यांना काल हार्ट अटॅक  आला नव्हता. मात्र कांबळेंना ब्रेन ट्यूमर असल्याचं पुढे आले आहे. या किलर बसमुळे एसटी बसचालकांवरच्या तणावाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.