सिंधुदुर्गातल्या घोणसरीमध्ये बस पलटली
सिंधुदुर्गमधील घोणसरीमध्ये एसटी बसला अपघात झाला आहे. या अपघातामध्ये कोणालाही मोठी दुखापत झालेली नाही.
सिंधुदुर्ग : सिंधुदुर्गमधील घोणसरीमध्ये एसटी बसला अपघात झाला आहे. या अपघातामध्ये कोणालाही मोठी दुखापत झालेली नाही. कणकवली आगाराची बस फोंड्याहून कुर्लीकडे जात होती.
घोणसरीमध्ये रस्त्याला खड्डे पडल्यामुळे ही बस पलटली आणि हा अपघात झाला. या अपघातात जखमी झालेल्यांना कणकवली ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.