नागपुरात बँक कॅशिअरचा हृदय विकाराने मृत्यू
हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने बँक कॅशिअरचा मृत्यू झाल्याची घटना नागपुरात घडली आहे.
नागपूर : हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने बँक कॅशिअरचा मृत्यू झाल्याची घटना नागपुरात घडली आहे.
आर वी राजेश असे मृत बँक कर्मचाऱ्याचे नाव असून ते स्टेट बँक ऑफ इंडियाच्या नागपुरातील अंबाझरी शाखेतील कॅशिअर पदावर कार्यरत होते. आज सकाळी साडे अकराच्या सुमारास बँकेत काम करत असताना हृदय विकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांना लगेच नजीकच्या खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र सुमारे एक तास शर्थीचे प्रयत्न करूनही त्याचा जीव वाचवण्यात डॉक्टर अपयशी ठरले.
आर वी राजेश मुळचे वाराणसीचे असून २०११ पासून ते भारतीय स्टेट बँकेच्या अंबाझरी शाखेत कस्टमर असिस्टंट म्हणून कामाला होते. आर वी राजेश हे वायुसेनेतून निवृत्त कर्मचारी होते.