संरक्षण राज्यमंत्र्यांनी घेतली जवान चंदू चव्हाणच्या कुटुंबियांची भेट

संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी रविवारी पाकिस्तानच्या ताब्यात असलेला जवान चंदू चव्हाणच्या कुटुंबियांची भेट घेतली. यावेळी चंदूला लवकरात लवकर पाकिस्तानातून परत आणण्याचे आश्वासन दिले.
धुळे : संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी रविवारी पाकिस्तानच्या ताब्यात असलेला जवान चंदू चव्हाणच्या कुटुंबियांची भेट घेतली. यावेळी चंदूला लवकरात लवकर पाकिस्तानातून परत आणण्याचे आश्वासन दिले.
भामरे आज बोरविहीर दौऱ्यावर आले होते. चंदू चव्हाणला परत आणण्याचे प्रयत्न सुरु असून सरकारवर विश्वास ठेवा असे आवाहन त्यांनी यादरम्यान केले.
जवान चंदू चव्हाण यांच्या कुटुंबियांशी चर्चा करुन सुटकेसाठी सुरु असलेल्या प्रयत्नांची त्यांनी यावेळी माहिती दिली. तसेच बोरविहीरकरांनी धीर सोडू नये असेही ते म्हणाले.