कल्याण : कल्याणमध्ये भटक्या कुत्र्यांची दहशत पसरली आहे. पिसाळलेल्या कुत्र्याने केलेल्या हल्ल्यात 9 लहान मुलं जखमी झालेत. कल्याण पूर्वीकडील चिकनी पाडा परिसरात ही घटना घडली आहे. 


या सर्व मुलांना कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या रुख्मिणीबाई रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सध्या या मुलांची प्रकृती स्थिर आहे. वाढत्या भटक्या कुत्र्यांचा त्रास कल्याणकरांना नवा नाही मात्र कुत्र्यांनी लहान मुलांना लक्ष्य केल्याने पालकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. या भटक्या कुत्र्यांचा लवकरात लवकर बंदोबस्त करण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे.