महाबळेश्वरमध्ये उठलं वावटळ, पर्यटकांची तारांबळ
महाबळेश्वरमध्ये वेण्णा लेक परिसरात उठलेल्या वावटळानं पर्यटक आणि दुकानदारांची तारांबळ उडवली.
महाबळेश्वर: महाबळेश्वरमध्ये वेण्णा लेक परिसरात उठलेल्या वावटळानं पर्यटक आणि दुकानदारांची तारांबळ उडवली. अंदाजे 100 मीटर उंचीवर गेलेलं हे वावटळ 5 मिनिटं घोंघावत होतं.
सध्या राज्याच्या तापमानात वाढ झाली आहे, त्यामुळे थंड हवेचं ठिकाण असलेल्या महाबळेश्वरमध्येही वाऱ्यांचा जोर वाढलाय. शनिवारी दुपारच्या वेळी आलेल्या या भोवऱ्यानं दुकानांच्या छत्र्या उडवून दिल्या. हे दृष्य कॅमेऱ्यात कैद करण्याची संधी पर्यटकांनी साधली.
पाहा वेण्णा लेकवरचं वावटळ