ठाणे : पालिका आयुक्तांनी काल केलेल्या कारवाईमध्ये मुजोर रिक्षा चालकांना चोप दिला होता. त्या विरोधात काही रिक्षा संघटना बंद पुकारणार होते. मात्र अजुनही रिक्षा सुरू आहेत. शहरात कालच्या फेरीवाला मुक्त करवाईनंतर फुटपाथवर एकही फेरीवाला दिसलेला नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुढच्या काही दिवसात ठाणे फेरीवाला मुक्त करण्याचा वि़डाच आयुक्त संजीव जयस्वाल यांनी उचलला आहे. त्यामुळे कालच्या कारवाईनंतर आज ठाण्यात सगळं काही सुरळीत आहे.


जैस्वाल यांचा बाहुबली अवतार काल ठाणेकरांना अनुभवता आला. काल रात्री पालिका उपायुक्त संदीप साळवी यांना झालेल्या मारहाणीनंतर पालिका प्रशासनानं गावदेवी परिसरात फेरीवाले, दुकानदार आणि रिक्षावाल्यांवर आज जोरदार कारवाई केली. 


यावेळी सुमारे 25 ते 30 दुकाने जमीनदोस्त करण्यात आली. गेल्या काही महिन्यांपासून मुजोर रिक्षावाल्यांच्या तक्रारीही आयुक्तांकडे येत होत्या. अशा मुजोर रिक्षाचालकांनाही आयुक्तांनी स्वत: चोप देत चांगलाच धडा शिकवला. यावेळी अवैध पार्किंग करणाऱ्या मोटर कारवरही करण्यात आली.