नांदूर माध्यमेश्वर धरणावर स्टंटबाजीचा कहर
धरणाचा जिल्हा असलेल्या नाशिक जिल्ह्यातील अनेक धरणे सुरक्षेविना आहेत. त्यामुळे या भरलेल्या धरणावर सध्या युवकांचा राबता असून स्टंट बाजी करत छायाचित्र काढण्याचं जीवघेणं धाडस करण्याचा धडाका सध्या सुरु झालाय.
नाशिक : धरणाचा जिल्हा असलेल्या नाशिक जिल्ह्यातील अनेक धरणे सुरक्षेविना आहेत. त्यामुळे या भरलेल्या धरणावर सध्या युवकांचा राबता असून स्टंट बाजी करत छायाचित्र काढण्याचं जीवघेणं धाडस करण्याचा धडाका सध्या सुरु झालाय.
नांदूरमाध्यमेश्वर धरणातील चक्राकार गेटच्या पाणी प्रवाहाच्या वर एका युवकाचे स्टंटबाजी येथील सुरक्षा व्यवस्थेचे धिंडवडे काढलेत. गोदावरी पात्रात पूर आल्याने नांदूरमाध्यमेश्वर धरणाचे मराठवड्याकडे जाणाऱ्या प्रवाहासमोरील चक्राकार दरवाजे उघडण्यात आले आहेत.
इथूनच नगर आणि मराठवड्याकडे पाण्याचा प्रवाह नियंत्रित होत असतो. त्यामुळे अधिकाधिक पाणी प्रावाहित करण्यासाठी नंदूरमाध्यमेशवर रिते करण्यात येतेय.
अशावेळी परिसरातील तरुण याठिकाणी जीवघेणे खेळ करत आहेत. मात्र वाचकांना असे आवाहन आहे की असले प्रकार करण्याआधी आपल्या घरी कुणी तरी वाट बघतंय याचं भान ठेवा.