पुणे : वादग्रस्त सनबर्ऩ फेस्टीव्हलच्या आयोजकांनी तब्बल 42 लाखांचा मुद्रांक शुल्क चुकवल्याचा प्रकार समोर आला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या फेस्टीव्हलसाठी केसनंदमधल्या जागेचा करारनामा भाडेपट्टा म्हणून नोंदवणं आवश्यक असताना आयोजक कंपनीन तो भाडेकरार म्हणून नोंदवला आहे. दस्त नोंदवताना कंपनीनं फक्त 12 हजार 500 रुपये इतकंच मुद्रांक शुल्क भरलं आहे. 


चुकीच्या पद्धतीनं करारनामा करुन दस्त नोंदणी केल्याबद्दल मुद्रांक विभागतर्फे कंपनीला 42 लाख 79 हजार 585 रुपये भरण्याची नोटीस बजावण्यात आली आहे. परसेप्ट लाईव्ह या कंपनीतर्फे सनबर्न फेस्टीव्हलचं आयोजन करण्यात आलंय.


नोटीसद्वारे मागणी करण्यात आलेलं मुद्रांक शुल्क 1 महिन्याच्या आत न भरल्यास प्रतिमाह 2 टक्के दंड आकारण्याचंही नोटीशीत म्हटलं आहे.