जळगावात जैन-महाजन एकाच मंचावर
जलसंपदामंत्री गिरीश महाजन आणि माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्यातील राजकीय दुरावा गेल्या अनेक दिवसांपासून पाहायला मिळतोय. या दोघा नेत्यांच्या दुराव्यात आणखी आगीत तेल ओतलं गेलंय.
जळगाव : जलसंपदामंत्री गिरीश महाजन आणि माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्यातील राजकीय दुरावा गेल्या अनेक दिवसांपासून पाहायला मिळतोय. या दोघा नेत्यांच्या दुराव्यात आणखी आगीत तेल ओतलं गेलंय.
जळगावमध्ये उपमहापौर आणि खडसेंचे विरोधक ललित कोल्हे यांच्या एलके फाऊंडेशनने आयोजित केलेल्या रावण दहनाच्या कार्यक्रमानिमित्त खडसे यांचे कट्टर राजकीय विरोधक असलेले माजी आमदार सुरेश जैन आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन एकाच व्यासपीठावर आले. यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्याय.
विशेष म्हणजे भ्रष्टाचाररुपीरावणाचे दहन करत असताना सुरेश जैन सोबत असल्याने दुहेरी आनंद मिळत असल्याचे गिरीश महाजन म्हणाले. तर माजी मंत्री सुरेश जैन यांनी पंतप्रधान मोदी यांच्या कार्याचे कौतुक केले.