जळगाव : तब्बल 9 वेळा आमदार राहिलेल्या जळगावच्या सुरेश जैन यांनी यापुढे निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे. जळगावात एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी याबाबत स्पष्टीकरण दिलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेल्या काही दिवसांपासून ते निवडणूक लढवणार का, याबाबत चर्चा रंगली होती. जळगावमधील घरकूल घोटाळा प्रकरणी सुरेश जैन यांना तुरुंगवास भोगावा लागला. 


मात्र न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला आहे. जिल्हा, उच्च आणि सर्वोच्च न्यायालयाने किमान 10 वेळा जैन यांचा जामीन फेटाळला होता. मध्यंतरी आजारपणामुळे केवळ 2 दिवसांचा तात्पुरता जामीन जैन यांना देण्यात आला होता. 


इतर काळ ते कारागृहातच होते. जैन हे प्रभावशाली नेते असून ते साक्षीदार व इतर आरोपांवर प्रभाव टाकू शकतात असा युक्तिवाद करीत सरकार पक्षाने जैन यांना जामीन मिळून दिला नव्हता. मात्र, या प्रकरणातील सर्व साक्षीदार व संशयित आरोपींचे जबाब झाले आहेत.