पुणे : राज्यात यावर्षी स्वाईन फ्लूचा उद्रेक जाणवतोय. १ जानेवारीपासून आजच्या तारखेपर्यंत स्वाईन फ्लूमुळे १०३ रुग्णांचा मृत्यू झालाय. ज्या H1N1 विषाणुमुळे स्वाईन फ्लू होतो त्याचं स्वरुप बदललं असण्याची शक्यता व्यक्त होत आहे. 


नाशिक शहरातही स्वाईन फ्लूचे पेशंट वाढले आहेत. निवासी डॉक्टरांच्या संप काळातही स्वाईन फ्लूच्या उद्रेकावर चिंता व्यक्त केली जात होती.