स्वाईन फ्लू | नाशिककरांनो जरा सांभाळून
नाशिकमध्ये स्वाईन फ्लूने तीन महिन्यात चौदा रुग्णांचा मृत्यू झाला आहे. स्वाईन फ्लू संशयितांच्या संख्येत झपाट्याने वाढ होतेय.
नाशिक : नाशिकमध्ये स्वाईन फ्लूने तीन महिन्यात चौदा रुग्णांचा मृत्यू झाला आहे. स्वाईन फ्लू संशयितांच्या संख्येत झपाट्याने वाढ होतेय. सरकारी दवाखान्यांमध्ये नवीन वर्षात 38 हजार रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे. त्यामध्ये 72 संशयितांना उपचारासाठी दाखल करुन घेण्यात आलं होतं. त्यापैकी साठ रुग्णांची चाचणी पॉझिटिव्ह आल्याने त्यांच्यावर उपचार सुरु करण्यात आले.
उर्वरित 18 जणांना उपचारानंतर घरी पाठवण्यात आलं. तपासणी केलेल्या नागरिकांपैकी संशयित अशा 249 रुग्णांना टॅमी फ्लूच्या गोळ्या देण्यात आल्यात. आतापर्यंत 2015 मध्ये सर्वाधिक 87 बळी गेलेत. नऊ वर्षांत स्वाईन फ्लूने जिल्ह्यातील 217 नागरिकांचे बळी घेतलेत.