जालना : राज्यभरात विनाअनुदानित शाळांच्या शिक्षकांनी सुरू केलेल्या आंदोलनानं आणखी एक बळी घेतलाय. जालन्यातल्या जाफ्राबादच्या गणेश खरात यांचा उपोषणादरम्यान मृत्यू झालाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेल्या नऊ दिवसापासून औरंगाबादमध्ये शिक्षकांचं उपोषण सुरू होतं.  काल खरात यांना अस्वस्थ झाली. त्यामुळे ते उपोषणातच घरी परतले आणि रात्री त्यांचा मृत्यू झालाय. गजानन खरात यांच्या मृत्यूनंतरही औरंगाबादमध्ये शिक्षकांचे आंदोलन सुरु आहे. 


सरकारच्या दुर्लक्षामुळे खरात यांचा जीव गेला, असा आरोप  उपोषणकर्ते शिक्षकांनी केला आहे. नऊ दिवस झाले असले तरी अजूनही सरकार खोटे आश्वासन देत असल्याचा आरोप शिक्षक करतायेत. खरात यांच्या कुटुंबियांना सरकारनं आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी शिक्षकांनी केली आहे.