नाशिक : विधान परिषदेच्या शिक्षक-पदवीधर मतदारसंघ निवडणुकीची मतमोजणी आज होणार आहे. नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत मुख्य लढत आघाडीतर्फे सुधीर तांबे तर भाजपातर्फे डॉ .प्रशांत पाटील यांच्यात आहे.


अमरावतीमध्ये गृहराज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील भाजपाचे उमेदवार आहेत. त्यांची मुख्य लढत काँग्रेसचे संजय खोडके आणि आमदार बच्चू कडू यांच्या 'प्रहार संघटने'चे डॉ. दिपक धोटे यांच्याशी आहे. तर कोकण विभाग शिक्षक मतदार संघात शिक्षक परीषदेचे वेणूनाथ कडू, शेकापचे बाळाराम पाटील, शिक्षक भारतीचे अशोक बेलसरे आणि परीषदेचे बंडखोर रामनाथ मोते यांचा प्रमुख उमेदवारांमध्ये समावेश आहे. मराठवाड्यात भाजपकडून सतीश पत्की, शिवसेनेकडून गोविंद काळे तर आघाडीकडून विक्रम काळे मैदानात आहेत.