नागपूर : नोटा बदलाच्या निर्णयामुळे राजकीय वातावरण तापतंय. पण नागपुरातलं वातावरण मात्र थंड व्हायला लागलंय. या महिन्यात 9.8 अंश सेल्सियस तापमानाची नोंद झालीय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेल्या दहा वर्षातलं हे सर्वात कमी तापमान आहे. नागपुरच्या इतिहासात आजवरच्या सर्वात कमी तापमानाची नोंद 1912 मध्ये 6.7 अशं सेल्सियस येवढी होती. वेधशाळेनं वर्तवलेल्या अंदाजानुसार आता पारा आणखी कमी होणारय. त्यामुळं विदर्भासह मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये गारठा वाढणारय. 


पुढच्या महिन्यात तर थंडीची लाट आणखी वाढणार असल्याचंही सांगितलं जातंय. यावेळी 5ते 6 अंशापर्यंत तापमान जाण्याची शक्यताही वेधशाळेनं वर्तवलीय. 


थंडी वाढत असली तरी गरम कपड्यांच्या मदतीनं नागपूरकर या गुलाबी थंडीचा आनंद लुटताना दिसतायत.