पुणे : जिल्ह्यातल्या 10 नगरपालिकांसाठी आज मतदान घेण्यात आलं. आळंदीमध्ये शांततेत मतदान पार पडलं. आळंदी मध्ये यंदाच्या नगरपालिका निवडणूकीत शिवसेना विरुद्ध भाजप असा थेट सामना रंगलाय. गेली १० वर्ष आळंदीत शिवसेनेची सत्ता आहे. यावेळी भाजप कडून शिवसेनेला कडवं आव्हान देण्यात आलंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भाजपने २ जागा बिनविरोध निवडून आणल्या आहेत. त्यामुळं निकालापुर्वी तरी भाजपचे पारडे जड असल्याचे चित्र आहे. 


नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून वैजयंती कांबळे,  शिवसेनेकडून भाग्यश्री रंधवे, बसपकडून डॉक्टर मनिषा रंधवे आणि काँग्रेस पुरस्कृत आशा गायकवाड यांच्यासह ८ उमेदवार रिंगणात आहेत. शिवसेनेचे शिवाजीराव आढळराव पाटील आणि भोसरीचे भाजप सहयोगी आमदार महेश लांडगे यांची प्रतिष्ठा पणाला लागलीय.


तळेगावमध्येही शांततेत मतदान
पुणे जिल्ह्यातल्या तळेगावमध्येही आज नगरपालिकेसाठी शांततेत मतदान पार पाडलं. नागरिकांकडून मतदानाला सकाळपासूनच मतदारांनी उत्साहात हजेरी लावल्याचे चित्र दिसतय. 


तर उद्या मतमोजणी होत आहे. त्यामुळे नगरपालिकेच्या तिजोरीच्या चाव्या कोणाकडे याचा फैसला आता मतदानयंत्रात बंद झालं आहे. थेट उद्याच त्याबाबतचं चित्र आता स्पष्ट होणार आहे.