दहा वर्षांच्या चिमुरड्यानं केला मेव्हण्याचा खून
वसईमध्ये एका दहा वर्षाच्या चिमुरड्याने चक्क आपल्या मेव्हण्याला ठार मारुन बहिणीचा जीव वाचवला. आपला मेव्हणा बहिणीला मारत असल्याचे पाहून या लहानग्यानं घरातील चाकूने मेव्हण्यावर वार केला. मारहाणीत मेव्हण्याचा जागीच मृत्यू झाला. मारहाणीच्या स्वभावाला वैतागून मृत व्यक्तीची पत्नी आपल्या माहेरी वसईला रहायला आलेली.
वसई : वसईमध्ये एका दहा वर्षाच्या चिमुरड्याने चक्क आपल्या मेव्हण्याला ठार मारुन बहिणीचा जीव वाचवला. आपला मेव्हणा बहिणीला मारत असल्याचे पाहून या लहानग्यानं घरातील चाकूने मेव्हण्यावर वार केला. मारहाणीत मेव्हण्याचा जागीच मृत्यू झाला. मारहाणीच्या स्वभावाला वैतागून मृत व्यक्तीची पत्नी आपल्या माहेरी वसईला रहायला आलेली.
रविवारी दुपारी दारुच्या नशेत पती घरी आलेला व पत्नीची मारहाण करु लागला. तेव्हा लहान भावाने त्याला अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यालाही त्याने गळा दाबून मारायचा प्रयत्न केला. याला प्रतिकार म्हणून या लहानग्याने घरातला चाकू मेव्हण्याच्या छातीवर मारला. मात्र रुग्णालयात नेण्याआधीच त्याचा मृत्यू झाला. अल्पवयीन मुलगा सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे.