वसई : राज्यभरात गौरी-गणपतीचे विसर्जन होत असतानान वसईतल्या एका गणेश भक्ताने गणपती बाप्पाला हेल्मेट घालून आपल्या बुलेटवर गणपती बाप्पाचे विसर्जन केलं.


गिरीश अय्यर असं या गणेशभक्ताचे नाव आहे. त्यांच्या घरी दरवर्षी गौरी गणपतीचे आगमन होतं. सध्या हेल्मेट सक्तीचं वारे वाहतायत. अनेकांचा त्याला विरोधही देखील आहे.  गिरीशनं चक्क गणपती बाप्पाल हेलमेट घालून आपल्या बुलेट वर बाप्पाला विराजमान करून त्याला भावपूर्ण निरोप दिला. वसईच्या किल्ला बंदर  समुद्रावर त्यानं हे विसर्जन केलं. दरम्यान, विसर्जन मार्गावर अनेकजण हेल्मेटचा बाप्पा पाहून कमालीचे भारवून गेले.