रत्नागिरी : शहरात चोरट्यांनी धुमाकुळ घातला आहे. गोखलेनाका परिसरातील आठ दुकानं चोरट्यांनी फोडलीत. प्रामुख्याने दुकाने आणि हॉटेल आपले टार्गेट ठेवले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यात भिडे यांचं योजक कोकणमेवा, रत्नागिरी वाईनमार्ट, कपड्याचं दुकांनावर चोरट्यांनी आपला हात साफ केला. दोन चोरट्यांनी हा सगळा प्रकार केल्याचं आता समोर येत आहे. दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी सळी-पकड याच्या सहाय्याने दुकानांचे टाळे तोडले आणि प्रवेश केला, अशा माहिती पुढे येत आहे.


चोरट्यांनी दुकानांच्या गल्ल्यामधील पैशांवर चोरट्यांनी डल्ला मारला. विशेष म्हणजे भर बाजारपेठेत हा सगळा प्रकार घडलाय.. सकाळी दुकानदार दुकानात आले त्यावेळी हा सगळा प्रकार उघड झाला. विशेष म्हणजे ही चोरी सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून रत्नागिरी पोलीस या चोरट्यांचा शोध घेत आहेत.