राम मंदिर उभारण्याबाबत नितीन गडकरी बोललेत, हे तीन पर्याय
भाजपच्या अजेंठ्यावर राम मंदिर उभारण्याचा मुद्दा कायम राहिला आहे. या मुद्द्यावरुन निवडणुका लढविल्या गेल्यात. मात्र, गतवर्षीच्या लोकसभा निवडणूक नरेंद्र मोदी आणि विकासाच्या मुद्द्यावर लढविल्या गेल्यात. त्यामुळे भाजपने राम मंदिराचा मुद्दा सोडला काय, याची चर्चा सुरु झाली. मात्र, केंद्रीय रस्ते वाहतूक व दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी राम मंदिरबाबत तीन मुद्दे पुढे केलेत.
नागपूर : भाजपच्या अजेंठ्यावर राम मंदिर उभारण्याचा मुद्दा कायम राहिला आहे. या मुद्द्यावरुन निवडणुका लढविल्या गेल्यात. मात्र, गतवर्षीच्या लोकसभा निवडणूक नरेंद्र मोदी आणि विकासाच्या मुद्द्यावर लढविल्या गेल्यात. त्यामुळे भाजपने राम मंदिराचा मुद्दा सोडला काय, याची चर्चा सुरु झाली. मात्र, केंद्रीय रस्ते वाहतूक व दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी राम मंदिरबाबत तीन मुद्दे पुढे केलेत.
अयोध्येत राम मंदिर उभारण्याचा मुद्दा हा कळीचा ठरलाय. विश्व हिंदू परिषदेने राम मंदिर झालेच पाहिजे, अशी भूमिका घेतली आहे. तर भाजपनेही राम मंदिरचा मुद्दा सुरुवातीपासून लावून धरला. मात्र, विकासाचे राजकारण करत, भाजपने राम मंदिरचा मुद्दा थोडा बाजुला ठेवला होता. आता केंद्रीय मंत्री आणि भाजपचे वरिष्ठ नेते गडकरी यांनी तीन पर्याय सुचविले असून राम मंदिरवर थेट भाष्य केलेय. त्यामुळे भाजप पुन्हा एकदा राम मंदिरचा मुद्दा उपस्थित करीत आहे.
राम मंदिरबाबत ३ मुद्दे
१. राम मंदिर उभारण्याबाबत न्यायालयात जायचे आणि तेथे लढाई लढायची.
२. राम मंदिर उभारण्यासाठी सहमती घडवून आणायची आणि मंदिर प्रश्न निकाली काढायचा.
३. अयोध्येत राम मंदिर उभारण्यासाठी लोकसभेत कायदा पास करावा लागेल.
There are 3 ways to build Ram Mandir,1 is by going to Court,other is through consensus & third by passing a law in Parliament: Nitin Gadkari