पुणे : स्मार्ट सिटी योजनेची वर्षपूर्ती तसेच या योजनेतील कामांचा शुभारंभ आज पुण्यात होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होत आहे. दरम्यान, महापौर यांचे निमंत्रण पत्रिकेत नाव नसल्याबद्दल वाद झाला आहे. 


मानापमान नाट्य सुरु


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बालेवाडीच्या शिवछत्रपती क्रीडा संकुलात कार्यक्रमाची जय्यत तयारी सुरू आहे. विशेष म्हणजे या राष्ट्रीय पातळीवरील कार्यक्रमाच्या आयोजनाची संधी पुण्याला मिळाली आहे. असे असताना या कार्यक्रमावरून राजकीय पक्षांमध्ये मानापमान नाट्य सुरू आहे. कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेत नाव नसल्याच्या कारणावरून महापौरांनी कार्यक्रमाला न जाण्याचा निर्णय घेतला आहे. तर महापौरांचा अपमान म्हणजे शहराचा अपमान असल्याचं सांगत राष्ट्रवादीनं कार्यक्रमावर बहिष्कार टाकला आहे. 


भाजपची सारवासारव, मुख्यमंत्र्यांची धावाधाव


पुणे येथे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत स्मार्ट सिटीचा कार्यक्रम पार पडतोय. पुण्याचे महापौर प्रशांत जगताप यांचं निमंत्रण पत्रिकेत नाव नसल्याबद्दल वाद झाला आहे. यावर स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापौरांशी चर्चा केली. आणि आजच्या कार्यक्रमात सहभागी होण्याची विनंती केली आहे. 


दरम्यान पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी बोलून निर्णय घेणार असल्याचं महापौर जगताप यांनी स्पष्ट केले आहे.