अकोला : अकोला महापालिका सभागृहात आज पुन्हा एकदा तोडफोड झाली आहे. वॉर्डातली कामंच होत नसल्यानं महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत विरोधी नगरसेवकांनी जोरदार गोंधळ घातला. सभागृहातलं व्यासपीठ आणि माईकची तोडफोड केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सत्ताधारी भाजप -सेना आणि विरोधी पक्षाच्या काँग्रेस, राष्ट्रवादी, भारिपच्या नगरसेवकांमध्ये यावेळी चांगलीच हमरी-तुमरी झालीय. विकास कामं करताना विरोधी पक्षाला डावललं जात असल्याचा आरोप विरोधकांनी केला. 


लहानलहान कामांसाठी सत्ताधारी पक्ष आणि प्रशासन निधी देत नसल्यानं विरोधकांनी सभागृहातच भीक मांगो आंदोलन केलं.