कोल्हापूर: इयत्ता दहावीमध्ये तब्बल ९४. ६० टक्के गुण मिळवलेला एक अत्यंत हूशार मुलगा घरफोड्या आणि मोटारसायकली चोरत असल्याचा धक्कादायक प्रकार कोल्हापूरात उघडकीस आलाय. अवधूत इश्वरा पाटील असं या घरफोड्याचं नाव असून, त्याचे वय अवघे १९ वर्षे इतकं आहे. केवळ चैनीसाठी त्याने तब्बल १० घरफोड्या केल्या असून २ मोटारसायकलीही चोरल्या आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

डॉक्टर होण्याचं स्वप्न पाहणा-या अवधूतच्या भावाचा मोबाईल चोरीला गेला. याचा त्याला राग आला आणि त्यानं रागापोटी चो-या करण्यास सुरुवात केली...इथूनच त्याच्या गुन्हेगारी दुनियेची सुरुवात झाली.


कॉलेजमधल्या इतर मुलांची लाइफस्टाइल पाहून त्याला लाज वाटू लागली आणि त्याला अभ्यासाऐवजी घरफोड्यातच गोडी वाटू लागली...सुरुवातीला अवधूतनं नोकरीच्या निमित्तानं एकत्रित राहणा-या मित्रांचे २ मोबाईल चोरले आणि ते ओएलएक्सवर खोटं अकाऊंट तयार करुन बत्तीसशे रुपयांना विकले.


मोबाईल, लॅपटॉप चोरता चोरता अवधूतनं घराचे, फ्लॅटचे कडीकोयंडे तोडण्यास सुरूवात केली...गेल्या सहा महिन्यात त्याच्यावर 10 घरफोड्यांचे गुन्हे दाखल झालेत. सोबतच गोवा, सावंतवाडीतून दोन बाईक चोरल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालाय. अवधूतकडून पोलिसांनी 11 लाख 36 हजार 325 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय.