मुंबई : मुंबई गोवा महामार्गावर वाहतूकीची कोंडी झाली आहे. उल्लेखनीय म्हणजे ही वाहतूक कोंडी सध्या महाडपर्यंत पोहोचलेली दिसतेय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोंडी कमी करण्यासाठी कोकणातून येणारी वाहने पाचाड रायगड मार्गे माणगावकडे वळवण्यात आली आहेत. माणगाव ते वहूरपर्यंत सुमारे  वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या पहायला मिळत आहेत.


शनिवारी गणेशोत्सवाची सांगता झाली त्यानंतर आज कोकणात आलेले चाकरमानी परतीच्या प्रवासाला निघाले आहेत. त्यामुळे महामार्गावर वाहनांची संख्या प्रचंड वाढली आहे त्याचाच परीणाम म्हणून चाकरमान्यांना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे.


गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्या भाविकांना यावेळी वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागले नव्हते, त्यामुळे सगळयांनी सुटकेचा निःश्वास सोडला होता परंतु परतीच्या प्रवासात एकाच जागेवर तासनतास थांबावे लागते आहे वाहनांची रांग तब्बल 20 किलोमीटरपर्यंत पोहोचली आहे.