कसारा : मुंबई-आग्रा महामार्गावर कसारा जवळ सुरु असलेल्या धबधब्याजवळ प्रवासी फोटो काढण्यासाठी थांबतात. अशाच एका धबधब्याजवळ दोन गाड्यातील प्रवासी थांबले असताना भरधाव ट्रकनं दोन्ही गाड्यांना उडवलं. त्यातील दोन प्रवासी जागीच ठार झाले. तर तीन जण जखमी झाले. 


परकर्णी कसारा पोलिसात गुन्हा दखल करण्यात आला असून ट्रक ताब्यात घेण्यात आलाय. त्यामुळे कोणत्याही रस्त्यावर कुठेही निसर्ग सौंदर्य पाहण्याचा मोह झाला तर सुरक्षित स्थळी उभे राहून त्याचा आस्वाद घ्यावा.