पुणे :   पुण्यातील लोहगाव येथील एअरफोर्स स्टेशनच्या परिसरात अवैधपणे व्हिडिओ शुटिंग करणाऱ्या दोघा बेकरी कामगारांना अटक करण्यात आली आहे. ऑफिशल सिक्रेट कायद्यांतर्गत यांना अटक करण्यात आली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जुबेर आलम अब्दुल रौफ अन्सारी (२५) आणि सईउद्दीन अन्सारी (४१) या उत्तर प्रदेशातील तरूणांना अटक करण्यात आली आहे. ते विमाननगर येथील बेकरीत काम करत असल्याचे विमानतळ पोलिस ठाण्यातील पोलिसांनी सांगितले. 


ते या ठिकाणी ६०० पॅटीस पोचविण्यास काल सायंकाळी आले होते. त्यातील जुबेर याने आपल्या व्हॅनमधून जात असताना फोनमधून शुटिंग सुरू केले.  विमानतळ परिसरात फोटो काढणे आणि शुटिंग करण्यास सक्त मनाई आहे, असे पोलिसांनी सांगितले. 


यावेळी पेट्रोलिंग करणाऱ्या पथकाने शुटिंग करताना या तरूणांना पाहिले आणि व्हॅन थांबवली. हे दोघे पळून जाण्याचा प्र्यत्न करत होते. त्यांचा पाठलाग करून त्यांना पकडले.  पथकाने त्यांच्याकडून मोबाईल फोन जप्त केला. त्यात विमानतळाचे शुटिंग होते. ते विचारलेल्या प्रश्नाची योग्य उत्तर देऊ शकले नाही त्यामुळे त्यांना पोलिसांच्या हवाले केले.