पालिका आयुक्तांना धमकी दिल्यानंतर गाडी जाळली
उल्हासनगरचे दबंग पालिका उपायुक्त युवराज भदाने यांची गाडी पेटविण्यात आली आहे.
उल्हासनगर : उल्हासनगरचे दबंग पालिका उपायुक्त युवराज भदाने यांची गाडी पेटविण्यात आली आहे. महानगरपालिका मुख्यालयातच हा प्रकार घडला. अनधिकृत बांधकामांवर कारवाई केल्यामुळे भदाने यांना धमकी देण्यात आली होती.
उल्हासनगर महापालिकेच्या आवारातच ही घटना घडलीये. घटना घडली त्यावेळी स्वतः भदाने गाडीपासून काही अंतर दूर होते. हेल्मेट घातलेले दोन जण मोटर सायकलवरुन आले आणि भदाने यांची गाडी पेटवून ते पसार झाले.
अनधिकृत बांधकामांवर कारवाई केल्यामुळे भदाने यांचे अनेक पुढारी, बिल्डर्सशी बिनसले होते. त्यातच गेल्या आठवड्यातच त्यांना धमकीही मिळाली होती. त्यानंतर आज घडलेल्या या घटनेमुळे भदाणेंच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय.