उस्मानाबाद : शिवसेनेचे खासदार रविंद्र गायकवाड यांच्या एअर इंडिया मारहाण प्रकरणात त्यांच्यावर अन्याय झाल्याचं सांगत सेनेनं उस्मानाबादमधील लोहारा, उमरगा तालुक्यात कडकडीत बंदचं आवाहन केलंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गायकवाड यांना दिल्ली विमानतळावर एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांनी उद्धट वर्तवणूक देऊन त्यांचे नाव एअर इंडिया व इतर विमान सेवा कंपनीद्वारे ब्लॅक लिस्टमध्ये टाकले आहे. 
कोणतीही चौकशी न करता त्यांना विमान प्रवास बंदी करण्यात आलीय. हे विमान कंपन्यांचे कृत्य बेकायदेशीर असल्याचं शिवसेनेचं म्हणणं आहे. गायकवाड यांच्यावर झालेल्या याच अन्यायाच्या निषेधार्थ लोहारा आणि उमरगा तालुक्यात शिवसेनेच्या वतीने सोमवारी कडकडीत बंद पाळण्यात येत आहे. 


त्याला व्यापारी संघटनानी पाठिंबा दिल्यामुळे गावातील दुकाने बंद आहेत. चौक आणि रस्त्यावर बंदचा चांगला परिणाम जाणवत आहे