रस्त्यावरील अनधिकृत मंडपाने घेतला एकाचा जीव
वसईत रस्त्यावरील मंडपामुळे एका इसमाला आपला जीव गमवावा लागला आहे. वसईच्या आम्बडी रोड परिसरातील मुख्य रस्त्यावर भाजी मार्केट समोर गणपतीसाठी मंडप टाकला होता आणि आज दुपारी याच मंडपां समोर एक अपघात होवून एकाला प्राण गमवावे लागले आहेत.
वसई : वसईत रस्त्यावरील मंडपामुळे एका इसमाला आपला जीव गमवावा लागला आहे. वसईच्या आम्बडी रोड परिसरातील मुख्य रस्त्यावर भाजी मार्केट समोर गणपतीसाठी मंडप टाकला होता आणि आज दुपारी याच मंडपां समोर एक अपघात होवून एकाला प्राण गमवावे लागले आहेत.
रस्त्यात मंडप उभारू नये, हे उच्च न्यायालयाचे आदेश असताना विश्वभारती फ्रुट विक्रेता संघाने रस्त्याचा निम्याहून अधिक भाग व्यापला आहे. आज दुपारी एका ट्रक चालकाने दुचाकी चालवणाऱ्या नाविनचंद शाह यांना जोरदार धडक दिली आणि या अपघातात शाह यांचा जागीच मृत्यू झाला आहे. मंडपाच्या अगदी समोर हा अपघात झाला आहे.
माणिकपूर पोलिसांनी वेळीच या मंडपाला रोकले असते तर आज कदाचित आज नाविनचंद्र शहा यांचे प्राण वाचले असते. तर याच मंडळाने गेल्या वर्षी अश्लील नृत्य करणाऱ्या तरुणींवर पैसे देखील उडवले होते. त्यामुळे या वर्षी सुरुवातीला पोलिसांनी परवानगी नाकारली होती.
तरीही या मंडळाने नाव बदलून मंडप उभारला होता. मात्र माणिकपूर पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतली होती. आता या अपघाताला जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित झाला आहे, उच्च न्यायालयाच्या आदेशाला माणिकपूर पोलिसांनी हरताळ फासला आहे. आता माणिकपूर पोलीस या अपघाताचा तपास करत असून दोषींवर कारवाई करणार असल्याचे त्यांनी सागितले आहे.