सनबर्न पार्टीला वारकरी संघटनेचा विरोध कायम, पुन्हा याचिका दाखल
पुण्यातल्या सनबर्न पार्टीचा मार्ग मोकळा झाला असला तरी वारकरी संघटनेचा विरोध कायम आहे. वारकरी संघटनेचे अध्यक्ष संदीप भोंडवे यांनी सनबर्नविरोधात दुसरी याचिका दाखल केली आहे. त्यावर सहा नंबर कोर्टात सुनावणी होणार आहे. दुसरीकडे संदीप भोंडवे आणि त्यांच्या समर्थकांच्या धरपकडीला सुरुवात झाली असून त्यांना पोलीस स्टेशनमध्ये स्थानबद्ध करण्यात आलं आहे.
पुणे : पुण्यातल्या सनबर्न पार्टीचा मार्ग मोकळा झाला असला तरी वारकरी संघटनेचा विरोध कायम आहे. वारकरी संघटनेचे अध्यक्ष संदीप भोंडवे यांनी सनबर्नविरोधात दुसरी याचिका दाखल केली आहे. त्यावर सहा नंबर कोर्टात सुनावणी होणार आहे. दुसरीकडे संदीप भोंडवे आणि त्यांच्या समर्थकांच्या धरपकडीला सुरुवात झाली असून त्यांना पोलीस स्टेशनमध्ये स्थानबद्ध करण्यात आलं आहे.
डीजे संघटना डीजे वाजवून निषेध करणार होते. त्यामुळं त्यांना चौकशीसाठी बोलावून स्थानबद्ध केले जात आहे. बेकायदा वृक्ष तोड, बेकायदा उत्खनन या विरोधात तक्रार करुनही शासकीय अधिकाऱ्यांनी कारवाई न केल्याने त्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्याची मागणी केली संदीप भोंडवे यांनी केली आहे. तसेच पार्टीला परवानगी देऊ नये अशी मागणी करण्यात आली आहे.